गे मातृभूमि तुजला मन अर्पियेले वक्तृत्व वाग्विभव ही तुज वहियेले
तूतेची अर्पिली नवी कविता मताला, लेखाप्रती विषय तूची अनन्य झाला!
त्वत्कार्य नैतिक सुसम्मत सर्व देवा, त्वत्सेवनीच गमली रघुवीर सेवा
सावरकर.
ही अहिंसा सत्यनीति वाटता नामर्दुमी
क्षात्रता दावा तुम्ही
सोडावा क्षेत्री लढूनी राज्यसत्तेचे लढे!
माधव जुलियन.
मुंबई मध्ये सुरू असलेला धुमाकूळ अखेर संपला. लोकांनी विजयाचा आनंद साजरा केला. पोलीस आयुक्तांनी 'मुंबई पूर्णपणे सुरक्षित असल्याची ग्वाही दिली. हे सारे कितपत खरे? दहशतवाद्यांच्या विरोधातला लढा संपला का? आपला विजय झाला असे समजताना आपण हे विसरू नये की दहशतवादी मरण्याच्या उद्देशनेच मुंबईत घुसले होते. इतकी हिंसा आणि जीवीत हानी केल्यावर जिवंत राहणे हा त्यांच्या साठी शाप आहे- चौकशी, छल, कोर्ट आणि फाशी हे त्यांना पुरते ठाऊक होते. प्रश्न इतका च होता की ते मारण्या आधी किती लोकांना मारतात! आणि कधी मरतात.त्यांनी खिंड चार दिवस राटरा अथक लढवली. १५० हून अधिक लोकांचा क्रूरपणे जीव घेतला आणि २०० हून जास्त प्रशिक्षित पोलीस आणि सैन्याला ४ दिवस झुंजत ठेवले! मान्य की सामन्या लोक अडकले असल्याने चार दिवस लागले पण ते लागले के सत्य आहे. आणि हा त्या अतिरेक्यांचा गौरव नक्कीच नाही पण ही वस्तुस्थिती आहे. आपण आपले महत्वाचे टीन अधिकारी लढाई सुरू होण्या आधीच गमावलेत! पुढच्या युद्धात एकूण २० हून जास्त अधिकारी कामी आलेत.
आणि आता मुंबई सुरक्षित आहे का? असा किव्हा ह्याहून भयानक हल्ला होणार नाही असे खात्रीने कोण सागु शकेल? ह्या घटनेतून जगासमोर काय आले? मुंबई सुरखही आहे/ काही दिवसात मुंबई सुरक्षित होऊ शकते हे, की मुंबईत कधी ही काही ही होऊ शकते हे?कोणाला वाटत असेल की आता आपण ह्या परिस्थितीसाठी सरकार, नेते आणि पोलीस खात्याला जबाबदार ठरववावे तर मला माफ करा. माझे मत तसे नाही. आता गरज आहे टी आणीबाणीच्या परिस्थिती मध्ये सगळ्या नागरिकांनी आपली जबबदारी ओळखण्याची. ह्यात मीडीया पण आलाच! आता गरज आहे ती अश्या प्रसंगी सुसूत्रपणे अधिकार्यांना मदत करायची. किती दिवस मुंबई चा सामन्या नागरिक आगतिक पणे कुणाच्या गोळ्यांना किव्हा बॉमम्ब्स ना बळी पडणार आहे? आता गरज आहे माझ्यासारख्या सर्व नागरिकांना आणीबाणीच्या प्रसंगाचे प्रशिक्षण मिळण्याची. खरे तर स्वप्रतिकारासाठी बचवचे शिक्षण घेण्यास काही हरकत नसावी. शस्त्रे बाळगायची परवानगी नसावी पण टी हातात आली की चालवता यावीत. आता हा वादाचा मुद्दा होऊ शकतो. पण हे जर हिट्लरी वाटते तर निदान बचावाचे शिक्षण तरी आवश्यक आहे ह्यावर दुमत नसावे. निदान जास्तीत जास्त मुलांनी लष्करात जायची तयारी दाखवावी. देशासाठी, जन सुरक्षेसाठी प्राण देण्याची मानसिकता तरुण मुळा मुलीन मध्ये असावी.
जी गीता गांधीजींनी प्रमाण मानली त्यात ही श्रीकृष्णाने 'तस्मात् युद्धाय युज्यस्व' असाच उपदेश केला आहे हे आपण लक्षात घ्यावे. आपल्या सामर्थ्याची शत्रुन्ना खात्री पटवून देणे हयात गैर काहीच नाही!
पोलीस नोकरीत सन्मान आहेच, त्यांना तसाच पगार, विमा व निवृत्ती वेतन मिळावे म्हणून प्रयत्न व्हायला हवेत. म्हणजे तरुण पिढी ह्या नोकरीकडे आकर्षित होईल. पेज थ्री संस्कृती पेक्षा डोळस देशभक्ती मनांमध्ये रुजवायला हवी. हिंसा करणे, निरपराध लोकांचे जीव घेणे ही आपली संकरती नव्हे. पण शस्त्राचे उत्तर कठोरपणे द्यायला आपण तयार असले पाहिजे. निरपराध जीव घेणे जितके भयंकर तसेच निरपराध आगतिक जीव घालवणे ही पापकारक नाही का? सिस्टम ला दोष देणे भ्याडपणा आहे. मी सिस्टम चा एक भाग आहे. सिस्टम सुधरावी असे वाटत असेल तर प्रत्येकाने प्रयत्न करायला हवेत. साधी गोष्ट आहे. जर लाच देणार्यांना उघड नावे ठेवता तर छोट्या छोट्या गोष्टींसाठी लाच का देता? आणि मग लाच खोरी बंद होईल अशी अपेक्षा का करता? प्रत्येक गोष्टीत हाच न्याय आहे. ही वेळ शहीद व्यक्तींना आठवून फक्त अश्रू गालायची नाही तर एक होऊन धडा ग्यायाची आहे. देश आणि नागरी सुरक्षे साठी सर्वांनी च रस्त्यावर उतरले पाहिजे. ज्या मीडीया ने बातमी दिली की रेलवे स्टेशन वरचे पोलीस संशयित व्यक्तिंची चौकशी करत नाहीत, त्यांनी ह्या पोलिसांचा उत्साह टिकून राहावा ह्यासाठी काय केले? ते वेळ काढून तिथे जाउन बसले का? देशप्रेमाचा ज्वर वरपासून खालपर्यंत झीरपट जायला हवा. मग पोलीस आणि सामन्यांमध्ये उत्साह सळसळेल. शाळांपासून मीडीया पर्यंत सगळ्यांची ही जबबदारी आहे.
काल पासून हा सगळा हलकल्लोळ बघून, वाचून, पोलीस व सैनिकांचे शौर्य, त्यांचे निर्भीड बलिदान बघून एरवी स्वताःच्या जीवाला अती जपणारा माझा १६ वर्षांचा भाउ आईला म्हणाला आई मला सैन्यात भरती होता येईल का? मला त्याचा इतका अभिमान वाटतोय. निदान परिस्थितिजन्य का होईना त्याच्या मनात ही इच्छा निर्माण व्हावी हा माझ्या पालकांच्या शिकवणीचा थोडा विजयच की नाही? बाबांची इच्छा होती की त्यांच्या मुलांपैकी एकाने तरी सैन्यात दाखल व्हावे. मला वाटायचे ड.Cक्टर म्हणून माझे क्षेत्र वेगळे आहे. पण आज जाणवते की देशाच्या आणि माझ्यासारख्या अनेक कुटुंबांच्या सुरक्षे साठी ज्याला शक्य त्याने लढायला हवे. आज मला घरी बसून बातमी वाचताना माझी लाज वाटली. ह्या वीस माणसांच्या जीवावर माझ्या सुरक्षेचा इमला उभा आहे हे जाणवून अस्वस्था वाटले. गरज पडली तर मला आणि माझ्या कुटुंबाला ह्या दहशतवादी लढ्यासाठी प्राण, बुद्धी, विचार काही तरी दिले पाहिजे. ही आज मला माझी जबबदारी वाटतेय.
देशाच्या सुरक्षा, अस्तित्व आणि अस्मितेसाठी भारताचे नागरिक काहीही पणाला लावायला तयार आहेत ह्याची जाणीव देशामाधाल्या आणि बाहेरच्या विघातक शक्तींना करून देणे ही प्रत्येक भारतीय नागरिकाची जबाबदारी आहे.
Saturday, November 29, 2008
Subscribe to:
Posts (Atom)